कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:26 IST2020-05-06T12:26:38+5:302020-05-06T12:26:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : संचारबंदीत दुकाने सुरू ठेवण्याबाबत चुकीची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी तळोदा नगरपरिषदेच्या ...

Show cause notice to tax inspectors | कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : संचारबंदीत दुकाने सुरू ठेवण्याबाबत चुकीची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी तळोदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचे कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संचारबंदीत शिथिलता देण्यात आली असताना तळोदा नगरपालिकेकडून ४ मे रोजी चुकीचे पत्रक व रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकावर चुकीची माहिती प्रसारित केली गेल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण प्रशासनाला खुलासा करावा लागला. या प्रकरणाची दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांनी पालिकेचे कर निरीक्षक राजेश पाडवी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राजेश पाडवी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी प्राप्त आदेशानुसार शहरातील नागरिकांना कोरोनासंदर्भात जाहीर आवाहान करण्यात येत आहे. जाहीर आवाहन तयार करण्याच्या सूचनेत बदल करणेकामी पाडवी यांना सूचित केले होते. तरी त्यांनी चुकीचे जाहीर आवाहान तयार केले. पाडवी यांच्याकडून जाहीर आवाहन देताना ‘अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील’ असे चुकीचे नमूद केले. यावरून आपल्याकडून कामाची तत्परता दिसून येत नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनही तक्रारी प्राप्त होत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल उपविभागीय अधिकारी यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटिसाचा खुलासा २४ तासाच्या आत सादर करावा अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

Web Title: Show cause notice to tax inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.