शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शहाद्यात ऑनलाईन जुगार अड्डय़ावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 12:37 IST

नाशिक येथील पथकाची कारवाई : मुंबई, गुजरातच्या 35 जणांना अटक; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : शहरातील नागराज नगरमध्ये मोबाईलवर आकडय़ांचा सट्टा खेळणा:या व खेळविणा:या अड्डय़ावर नाशिक येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सुमारे 35 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे आठ लाख दोन हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. दरम्यान, या 35 जणांना शुक्रवारी न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.पोलीस सूत्रानुसार, शहरातील नागराज नगरातील एका दुमजली इमारतीत पियुष द्वारकादास ठक्कर (रा.ठाणे) व पिन्याकल पटेल (रा.अमरावती) हे लोकांकडून              पैसे घेऊन आकडय़ांचा सट्टा खेळवीत असल्याची गुप्त माहिती राज्य             गुन्हा अन्वेषण विभागाचे नाशिक येथील प्रभारी पोलीस अधीक्षक अनिल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.डी. भावसार व त्यांच्या सहका:यांनी येथील नागराज नगरमधील दुमजली इमारतीत गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकली. या धाडीत आठ लाख दोन हजार रुपयांच्या मुद्देमालासह 35 जणांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिका:यांनी धाड टाकण्यापूर्वी शासकीय पंच म्हणून कांतीलाल बडगुजर व राहुल राजेंद्र ठाकरे             यांना याबाबत माहिती देऊन धाड टाकली.या इमारतीत 35 जण आकडय़ांचा सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आले. त्यात पियुष द्वारकादास ठक्कर (ठाणे), हरिष चंद्रा सिंग (मुंबई), दुर्गेश मधुकर कडवलवार (यवतमाळ), हसमुख खिमजी राजधोर (बिधराकच्छ, गुजरात), जयंतीलाल मनसुखलाल गोहील (मुंबई), अनिरुद्धसिंग प्रतापसिंग राठोड (देवपूर, गुजरात), मनसुख भगवानजी रायचुरा (वडाळा राणा, गुजरात), कन्हैय्यागिरी लक्ष्मणगिरी गोस्वामी (चंदोडा, उदयपूर), मैज्जा मालाभाई रब्बारी (गायदेवपार्क, गुजरात), सुभाष मोरारजी हरनावतसियारीया (मुंबई), अरुण सलोराज साईराम             (मुंबई), दीपक हसमुखलाल संघवी (मुंबई), अशोक सिद्धेश्वर हेगडे (ठाणे), निखलेश जयदत्त                सपकाळ (बीड), कमलेश डायाभाई रबारी (देवपूर, गुजरात), पचाण सोमाभाई रबारी (देवपूर, गुजरात), भरत चत्रभुज मांगे (कल्याण), नथ्थू मालाभाई रबारी (देवपूर, गुजरात), कांतीलाल मोरारजी  देढीया (मुंबई), लखमसी नानजी शहा (ठाणे), राहनसिंग बुधुवा राठोड (देवपूर, गुजरात), हसमुख विसंजी निसर (नालासोपारा), दीपक गोरेलाल कुशवाह (खिमलासा, मध्य प्रदेश), किरीट भिकुबा जडेजा (तळवाडा, गुजरात), प्रकाश नारायण राणे (जावळे, जि.सिंधुदुर्ग), मुराभाई            पभा खट्टाणा (देवपूर, गुजरात), दलपतसिंह हरीसिंगजी जडेजा (देवपूर, गुजरात), वीरचंद उमरसिंह छेडा (ठाणे), लीलाधर रायरी देढीया (मुंबई), गणेश शिवराम कदम (मुंबई), क्रिपालसिंह फतेसिंह वाघेला (हनुमान सैली, गुजरात), वेरसी देवा रबारी (मांडवी, गुजरात), आशिष मनसुखलाल गडाख (मुंबई),               दीपक भोगीलाल सचदे (मुंबई), नितीन रानसी लालन (मुंबई) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून                   सात लाख रुपये किमतीची पांढ:या रंगाची कार (क्रमांक एम.एच.04 एचएक्स- 5691), वेगवेगळ्या कंपन्यांचे 20 मोबाईल संच, लॅपटॉप, 10 कॅलक्युलेटर, अंक लिहीलेले 27 गठ्ठे व किरकोळ साहित्य असा सुमारे आठ लाख एक हजार 630 रुपये किमतीचा ऐवज व रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे नाशिक येथील पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार              कायदा कलम 4 व 5 प्रमाणे शहादा पोलीस स्टेशनला 35 जणांविरुद्ध गुन्हा दखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव हे तपास करीत         आहेत. नाशिक, धुळे व नंदुरबार येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एन. चौधरी, हे.कॉ.आनंत पाटील, नरेंद्र राऊत, दिलीप माने, किशोर खरोटे, सुरेश भालेराव, बाळू पाटील, मनोहर जाधव, वाहन चालक रवी वाघ, किरण पाटील, दिनेश बोरसे, विशाल वळवी यांनी ही कारवाई केली.