१५ मेपासून दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST2021-05-14T04:30:07+5:302021-05-14T04:30:07+5:30

दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रियेसाठी कुठल्याही बंधनाशिवाय परवानगी असेल. तथापि दूध विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ...

The shops will be open from May 15 till 1 pm | १५ मेपासून दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार

१५ मेपासून दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार

दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रियेसाठी कुठल्याही बंधनाशिवाय परवानगी असेल. तथापि दूध विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत घरपोच दूध विक्रीस मुभा असेल. जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक सातुड्याच्या डोंगराळ भागात राहात असल्याने त्यांना तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी सकाळी ११ पूर्वी येणे शक्य होत नाही. त्यामुळे खालील काही बाबींसाठी मुभा देण्यात आली आहे.

कृषी अवजारे आणि कृषी उत्पादने यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, इलेक्ट्रिक मोटार व ट्रॅक्टरची खरेदी आणि दुरुस्ती इ.) आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील.

जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला, फळे, मिठाई, बेकरी आणि सर्व प्रकारचे खाद्यान्न (अंडी, चिकन, मटन, मासे, पोळी-भाजी) दुकाने व पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने, वीज, पाणी, गॅस वितरण, वृत्तपत्र छपाई व वितरण आदी अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू राहतील.

वरील ठिकाणी कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यप्रणालीचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापना मालक, संस्था चालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येऊन सदर दुकान किंवा आस्थापना संचारबंदी कालावधीपर्यंत सील करण्यात येईल. जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पूर्णत: संचारबंदी लागू असून, वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दूध विक्रेता, वृत्तपत्र छपाई व वितरणास मुभा राहील.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहिता यामधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: The shops will be open from May 15 till 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.