शॉपिंग मॉल व व्यावसायिक संकुले खुली होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:07 IST2020-08-05T21:07:49+5:302020-08-05T21:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिशन बिगीन अगेनअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात २१ आॅगस्टपर्यंत काही शिथिलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश ...

शॉपिंग मॉल व व्यावसायिक संकुले खुली होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मिशन बिगीन अगेनअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात २१ आॅगस्टपर्यंत काही शिथिलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार ५ आॅगस्ट पासून मॉल आणि व्यावसायिक संकुले निर्धारित वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे़
यात चित्रपट गृह सुरू करण्यास अनुमती मात्र देण्यात आलेली नाही. मॉल आणि व्यावसायिक संकुल, दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ यादरमयन सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे़ जिल्हांतर्गत बससेवा ही जास्तीत जास्त ५० टक्के प्रवासी क्षमतेसह सुरू राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, विना वातानूकूलीत हॉल्स हे २३ जून रोजीच्या आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी असेल. वृत्तपत्र छपाई व वृत्तपत्र विक्रेत्यांना मुभा असेल. सर्व कटींग सलून, स्पा, सलुन्स, ब्युटी पार्लर हे २५ जून रोजीच्या आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी असेल. जलतरण तलाव वगळता मैदानी खेळांना सामाजीक अंतर आणि सॅनिटायझेशन करण्याच्या अटीवर सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे़
रिक्षासाठी वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी, चारचाकी वाहनासाठी वाहनचालक व इतर तीन प्रवासी आणि दुचाकी वाहनावर चालक आणि सहप्रवाशास अनुमती असेल. दूचाकीवर मास्क आणि हेल्मेट घालणे आवश्यक राहील. विविध बाबीसाठी दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे.