दुकानदाराची नजर चुकवून मोबाईल लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:40 IST2020-11-23T12:40:29+5:302020-11-23T12:40:37+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दुकानदाराला वस्तू दाखवण्यात गुंतवून ठेवत त्याचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी ...

The shopkeeper lost sight of the mobile | दुकानदाराची नजर चुकवून मोबाईल लांबवला

दुकानदाराची नजर चुकवून मोबाईल लांबवला

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  दुकानदाराला वस्तू दाखवण्यात गुंतवून ठेवत त्याचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हा प्रकार दुकानदाराच्या सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. 
शहरातील एकलव्य हायस्कूलसमोर विशाल कुशसिंग ठाकूर यांच्या दुकानात हा प्रकार घडला होता. शुक्रवारी ठाकूर हे ईलेक्ट्रीक दुकानात असताना ग्राहक म्हणून आलेल्या एकाने लाईटची मागणी केली. यावेळी ठाकूर यांनी त्यांचा मोबाईल कांउंटरवर ठेवत ग्राहकाने मागणी केलेला लाईट दाखवला. याचदरम्यान अज्ञात ग्राहकाने चलाखीने ठाकूर यांचा काउंटरवर ठेवलेला १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल लंपास केला. दुकानदार ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू तो मिळून आला नाही. याबाबत विशाल ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: The shopkeeper lost sight of the mobile