नंदुरबार आगाराकडून मुंबईपर्यंत शिवशाही बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:44 IST2020-02-01T13:44:19+5:302020-02-01T13:44:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराकडून नंदुरबार-मुंबई शिवशाही आणि नंदुरबार- पुणे दरररोज सायंकाळी दोन स्लीपर ...

Shivshahi bus service from Nandurbar bus station to Mumbai | नंदुरबार आगाराकडून मुंबईपर्यंत शिवशाही बससेवा

नंदुरबार आगाराकडून मुंबईपर्यंत शिवशाही बससेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराकडून नंदुरबार-मुंबई शिवशाही आणि नंदुरबार- पुणे दरररोज सायंकाळी दोन स्लीपर बसेस सुरू करण्यात येणार आहेत़ १ फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी ही सेवा सुरु होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून शिवशाही व स्लिपर सुरु करण्याची मागणी होती़
आगाराने दिलेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी पासून दररोज सायंकाळी ८ वाजता नाशिक मार्गे नंदुरबार ते मुंबई शिवशाही बस सेवेचा प्रारंभ होत आहे. तसेच प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणाऱ्या नंदुरबार- पुणे शिवशाही स्लीपर बससोबत आणखी एक स्लीपर बस सुरू करण्यात येत आहे. याशिवाय अहमदनगर मार्गाने जाणारी नंदुरबार- पुणे परीवर्तन बस दररोज सायंकाळी ७ : ४५ वाजता सुटत आहे़ २९ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजेची नंदुरबार-कल्याण आसनी कम स्लीपर विना वातानुकूलित बस नियमित सुरू असल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रण मनिषा सपकाळ व आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली आहे़

Web Title: Shivshahi bus service from Nandurbar bus station to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.