शिव्रे येथे किरकोळ वादातून दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:18 IST2019-06-21T12:18:20+5:302019-06-21T12:18:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिव्रे ता़ तळोदा येथे मागील भांडणाची कुरापत काढून एकास कु:हाडीने तर दुस:याला डेंगा:याने मारहाण ...

शिव्रे येथे किरकोळ वादातून दोघांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिव्रे ता़ तळोदा येथे मागील भांडणाची कुरापत काढून एकास कु:हाडीने तर दुस:याला डेंगा:याने मारहाण करण्यात आली़ बुधवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली़
कृष्णा अजरुन राऊळ यांच्यासोबत अशोक बहादुर राऊळ याने मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला होता़ यातून अशोक राऊळ याने कु:हाडीने कृष्णा राऊळ यांच्यावर वार केला़ तसेच विलास राऊळ यांच्या हातासह डाव्या पायाच्या अंगठय़ावर मारहाण करुन दुखापत केली़ तसेच शिवीगाळ करुन दमदाटी केली़ याबाबत कृष्णा राऊळ यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र जाधव करत आहेत़