शहाद्यात शिवचित्र प्रदर्शनी व शिव विचार जागर वाचन कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST2021-02-20T05:32:06+5:302021-02-20T05:32:06+5:30

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणाचे आद्यजनक व शिवरायांचे समाधी शोधणारे महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून ...

Shivachitra exhibition and Shiv Vichar Jagar reading section in Shahada | शहाद्यात शिवचित्र प्रदर्शनी व शिव विचार जागर वाचन कट्टा

शहाद्यात शिवचित्र प्रदर्शनी व शिव विचार जागर वाचन कट्टा

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणाचे आद्यजनक व शिवरायांचे समाधी शोधणारे महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून प्रतिमा पूजन शिवाजी मोतीराम पाटील व उद्योजक श्याम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व उपनगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी तहसीलदार डॉ.कुलकर्णी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले भूतकाळ नसून त्यांचा विचार हा आपला वर्तमान काळ आहे आणि त्या विचारातून भविष्यकाळ घडवणे हे आपले कर्तव्य आहे. मोतीलाल पाटील म्हणाले की, शिव व्याख्यानमाला समितीने शिव व्याख्यानासह चित्र प्रदर्शन व शिव विचार जागर वाचन असे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून तरुणांना दिशा देण्यासाठी मार्गदर्शक कार्य करत आहे. शिवरायांचे विचार आचरणात आणून सर्वांनी शिवरायांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. शहरात छत्रपती शिवरायांचा भव्य-दिव्य पुतळ्याचे अनावरण होईल. यासाठी शहादा नगरपालिकेतील सर्व यंत्रणा पदाधिकारी व नगरसेवक हे सगळेच जण उत्सुक असून लवकरच या पुतळ्याचे अनावरण होऊन शहादेकरांचे स्वप्न साकार होणार आहे. आज सण व उत्सव हे नेहमीच ढोल-ताशांच्या गजरात होतात. पण शिव व्याख्यानमाला दरवर्षी नवीन काहीतरी उपक्रम आणून समाजातील जनमानसात एक नवीन विचार पेरण्याचे काम करीत आहे, असे सांगितले.

या वेळी भरविण्यात आलेली शालेय विद्यार्थ्यांच्या स्वचित्रांची चित्र प्रदर्शनी खूपच सुंदर होती. त्यात ३० शाळांमधून सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील निवडक चित्रांचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या चित्रप्रदर्शनात विशेष बाब म्हणजे शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न वास्तवात आणणाऱ्या सर्व शिलेदारांचा चित्ररूप परिचय मनाला भावणारा होता. लोकांना प्रेरणा देणारा होता, अशा प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केल्या. मान्यवरांनी वाचनकट्टामध्ये सहभाग घेऊन वाचनाची प्रेरणा देण्याचाही एक उत्तम प्रयत्न दिसून आला. कारण वाचनानेच मनुष्य घडतो आणि शिवविचार वाचले तर पुन्हा एक नवीन शिवविचार लोकांमध्ये जागृती होईल, असा आयोजनातील हेतू लोकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार सरजू चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.दत्ता वाघ, हिंमतराव बोरसे, डॉ.वनमाला पवार, दिलीप गांगुर्डे, हेमलता शितोळे, अरुण पाटील, स्नेहलता पाटील, दत्तात्रय शिंदे, भानुदास पाटील, रामजी पाटील, किशोर मोरे, राजेंद्र पाटील, शरद पाटील, पुंडलिक पाटील, डॉ.किशोर पाटील, महिला भाजप शहराध्यक्षा रोहिणी भावसार, संतोष वाल्हे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिव व्याख्यानमाला समिती व सकल मराठा समाजाच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shivachitra exhibition and Shiv Vichar Jagar reading section in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.