शहादा येथे शिवगायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:18+5:302021-02-12T04:29:18+5:30

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष निकेश ...

Shiva singing competition at Shahada | शहादा येथे शिवगायन स्पर्धा

शहादा येथे शिवगायन स्पर्धा

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष निकेश राजपूत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार, कल्पना पंड्या, नगरसेविका विद्या जमदाळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, शहराध्यक्ष विनोद जैन, माजी नगरसेवक रवींद्र रावळ, युवा अध्यक्ष हर्षल पाटील, कमलेश जांगीड, जयेश देसाई आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जयघोष करीत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या अश्वावरील तरुणाने मावळ्यांसह मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देत तरुण कलावंतांच्या अंगी असलेल्या विशेष कलागुणांना या माध्यमातून वाव मिळावा, हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे निकेश राजपूत यांनी सांगितले.

विजय चौधरी म्हणाले की, शिवगायन स्पर्धा ही तरुण-तरुणींना प्रेरणा देणारी असून भाजपच्या सांस्कृतिक आघाडीतर्फे जिल्ह्यात अभिनव स्पर्धा होत आहेत. त्या माध्यमातून तरुणाईतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे, असे सांगितले.

दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात जिल्हास्तरीय फेरी झाली. विजेत्यांना १९ फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा गडावर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. वैयक्तिक गटात एकनाथ भोईर यांच्या ग्रुपने तर दुसऱ्या गटात हर्षल पाटील ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून परिजात चव्हाण व वीरेंद्र सैंदाणे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मेघा खारकर तर निकेश राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कमलेश जांगीड, नरेंद्र पाटील, रोहिणी शिंपी, पूजा पाटील, रोहिणी भावसार, पंकज सोनार, अनामिका चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shiva singing competition at Shahada