रॅलीतून सहभागी शिवप्रेमींचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:28 IST2020-03-13T12:27:38+5:302020-03-13T12:28:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवजयंतीचे औचित्य साधून नंदुरबार शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या ...

Shiva lovers cheering from the rally | रॅलीतून सहभागी शिवप्रेमींचा जल्लोष

रॅलीतून सहभागी शिवप्रेमींचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिवजयंतीचे औचित्य साधून नंदुरबार शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत विविध मान्यवरांसह शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक व महिलांनी सहभाग घेतला़ यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने शहर दणाणले होते़
शहरातील जुनी नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सायंकाळी रॅलीला प्रारंभ करण्यात आला़ रॅलीत सात व्यायाम शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला होता़ त्यांच्याकडून ट्रॅक्टरवर शिवप्रतिमा तसेच मूर्ती ठेवून सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले़ बालशिवाजी, राज्याभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्यासह विविध चित्ररथही रॅलीत समाविष्ट करण्यात आले होते़ माळीवाड्याचा राजा व्यायामशाळा, मारुती व्यायाम शाळा, सुवर्ण युवा शक्ती ग्रुप, शिवजयंती महाराष्ट्र व्यायाम शाळा, रायसिंगपुरा व्यायाम शाळा यांनी रॅलीत सहभाग नोंदवला होता़
उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा़ डॉ़ रविंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र जैन, भाजपाचे पालिका गटनेते अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रविण गुरव, अर्जुन मराठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़
शहरातील जुनी नगरपालिका येथून नेहरु पुतळा, महात्मा गांधी चौक, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, मोठा मारुती मंदिर या मार्गाने रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराजवळ समारोप करण्यात आला़ रॅलीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

शिवजयंतीच्या उत्साहातही उपस्थित शिवप्रेमींनी कोरोनाच्या जनजागृतीकडे लक्ष देत नागरिकांचे प्रबोधन केले़ चित्र रथांसोबत चिमुकले बालक आणि विद्यार्थ्यांनी रॅलीत कोरोनाबाबत संभ्रम निर्माण करुन अफवा पसरवू नका असे आवाहन केले़ चिमुरड्यांच्या या प्रयत्नाला उपस्थित मान्यवरांकडूनही दाद देण्यात आली़

Web Title: Shiva lovers cheering from the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.