शपथविधीनंतर शिवसैनिकांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:15 IST2019-11-29T12:14:53+5:302019-11-29T12:15:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच नंदुरबारसह शहादा, तळोद्यात शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणावर जल्लोष केला. ...

शपथविधीनंतर शिवसैनिकांचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच नंदुरबारसह शहादा, तळोद्यात शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढा भरविला.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत शपथ घेतली. त्यानंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. सकाळपासूनच या क्षणाची उत्कंठा शिवसैनिकांना लागून होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाल्यानंतर जल्लोषाला सुरुवात झाली. आमदार कार्यालयानजीक मोठय़ा संख्येने विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेनेच्या स्टेशनरोडवरील स्वामी समर्थ केंद्रासमोरील कार्यालयाजवळ देखील मोठय़ा संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. या ठिकाणी देखील जुन्या शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.
याशिवाय तळोदा, शहादा येथे देखील शिवसैनिकांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. मुंबई येथील शपथविधी सोहळ्यासाठी शेकडो शिवसैनिक बुधवारी सायंकाळीच रवाना झाले होते.
दरम्यान, जिल्ह्यातून कुणाला मंत्रीपद मिळते याबाबत आता उत्सूकता लागून आहे. आमदार अॅड.के.सी.पाडवी हे गुरुवारी मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तविली गेल्याने उत्सूकता वाढली होती.