महागाई विरोधात शिवसेनेची शहाद्यात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:14+5:302021-02-06T04:58:14+5:30

यावेळी प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, नुकताच केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. ...

Shiv Sena's cycle rally against inflation | महागाई विरोधात शिवसेनेची शहाद्यात सायकल रॅली

महागाई विरोधात शिवसेनेची शहाद्यात सायकल रॅली

यावेळी प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, नुकताच केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवर अतिरिक्त भार लावल्याने पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या किमती वाढणार असून यामुळे दळणवळण महागणार असल्याने महागाई वाढणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी असतानाही देशात मात्र पेट्रोल शंभरीकडे वाटचाल करीत आहे. अर्थसंकल्पापाठोपाठ केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. अगोदरच डाळी व तेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ करून सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल केले आहे. केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांवरील अतिरिक्त भार तात्काळ रद्द करून पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांनी निवेदन स्वीकारले.

सायकल रॅलीत उपजिल्हाप्रमुख प्रा. सखाराम मोते, शहरप्रमुख रोहनकुमार माळी, संघटक मधुकर मिस्तरी, माजी नगरसेवक विनोद चाैधरी, सागर पाटील, इद्रीस मेमन, दिलीप पाटील, बापू चाैधरी, प्रवीण सैंदाणे, उत्तम पाटील, सोमेश्वर सोनार, मनोज सोनार, निलेश पाटील. सागर चाैधरी, प्रकाश तिरमले, गणेश चित्रकथे, प्रशांत नायक, विवेक भावसार, राजू लोहार, पंडित माळी, गुलाब सुतार, सुरेश मोरे, भगवान अलकरी, प्रवीण बोरदेकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena's cycle rally against inflation