शिवजयंतीला डीजे वाजवल्याने मंडळांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:01 IST2020-03-15T13:01:36+5:302020-03-15T13:01:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवजयंतीला विनापरवाणगी डीजे लावणे व क्षमतेपेक्षा अधीक आवाज ठेवल्याप्रकणी सहा तालीमसंघ आणि डीजे मालकांविरुद्ध ...

Shiv Jayanti's crime by playing DJ | शिवजयंतीला डीजे वाजवल्याने मंडळांवर गुन्हे

शिवजयंतीला डीजे वाजवल्याने मंडळांवर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिवजयंतीला विनापरवाणगी डीजे लावणे व क्षमतेपेक्षा अधीक आवाज ठेवल्याप्रकणी सहा तालीमसंघ आणि डीजे मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये खळबळ उडाली आहे.
नंदुरबारात १२ मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सहा तालीमसंघ व मंडळांनी डीजे लावून मिरवणुका काढल्या होत्या. मिरवणुकांमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियमाद्वारे नेमून दिलेल्या तीव्रतेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला. शिवाय स्थानिक रहिवासी आणि शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन ईजा होईल अशी कृती केली. पोलीस अधिकारी व कर्मचारी सांगण्यास गेले असता त्यांच्याशी हुज्जत घातल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
फौजदार सुनील बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून विरभगतसिंग व्यायाम शाळाचे अध्यक्ष संदीप चौधरी व वाहन धारक, डीजे मालक रिंकू गोसावी, आॅपरेटर भूषण पाटील यांच्याविरुद्ध.
जमादार सुभाष ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक रमण शिंदे आणि डीजे मालक.
जमादार राजेंद्र बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून मारुती व्यायाम शाळेचे अध्यक्ष गिरीष पावबा मराठे यांच्याविरुद्ध. हवालदार रवींद्र पवार यांच्या फिर्यादीवरून नवजीवन व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल रमेश परदेशी यांच्याविरुद्ध.
हवालदार गणेश दगडू धनगर यांच्या फिर्यादीवरून दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश अरुण सोनार यांच्याविरुद्ध व पोलीस नाईक दिपक रामभाऊ गावीत यांच्या फिर्यादीवरून वीर छत्रपती ब्रिगेड मंडळाचे अध्यक्ष खुशाल जगदीश चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Shiv Jayanti's crime by playing DJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.