किरकोळ वादातून शिर्वे येथे युवतीवर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:06 IST2021-03-02T13:06:09+5:302021-03-02T13:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शिर्वे येथे किरकोळ वादातून युवतीवर एकाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी ...

किरकोळ वादातून शिर्वे येथे युवतीवर कोयत्याने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील शिर्वे येथे किरकोळ वादातून युवतीवर एकाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. जखमीव युवतीवर उपचार सुरू आहेत. राधा राजू वसावे (२७) असे जखमी युवतीचे नाव आहे.
सोमवारी राधा वसावे यांच्या शिर्वे येथील घराचे बांधकाम सुरू असल्याने वाळू आणून टाकण्यात आली होती. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या पुन्या माथ्या वसावे याने राधा वसावे यांच्यासोबत रहदारीसाठी जागा का, नाही सोडली यावरून वाद घातला होता. यातून पुन्या वसावे याने कोयता आणून राधा वसावे हिच्यावर वार केला. यात तिने हात आडवा करून अडवण्याचा प्रयत्न केल्याने मनगटावर जखम झाली.
याप्रकारानंतर जखमी राधा हिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पुन्या वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल किसन वळवी करत आहेत.