शिरपूरला सेवानिवृत्त तहसीलदाराला लुटले
By Admin | Updated: January 23, 2017 00:53 IST2017-01-23T00:53:01+5:302017-01-23T00:53:01+5:30
शिरपूर : येथील सेवानिवृत्त तहसीलदाराला अडवून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह सोन्याची चेन लांबून नेल्याची घटना शिंगावे गावाच्या शिवारातील पुलावर ही घटना घडली़

शिरपूरला सेवानिवृत्त तहसीलदाराला लुटले
शिरपूर : येथील सेवानिवृत्त तहसीलदाराला अडवून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह सोन्याची चेन लांबून नेल्याची घटना शिंगावे गावाच्या शिवारातील पुलावर ही घटना घडली़
सेवानिवृत्त तहसीलदार प्रल्हाद मदन दाभाडे (रा़वाघाडी हल्ली निमझरी नाका, गणपती मंदिराजवळ शिरपूर) हे शेतातील पत्र्याचे शेडचा सामान ट्रॅक्टरमध्ये भरून आणत होत़े त्यावेळी वाघाडीचे नाना उत्तम कोळी यांनी ट्रॅक्टर अडवून कुणाच्या परवानगीने भरून नेत आहे, त्यांच्याशी बाचाबाची करून मारहाण केली़ तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली़
दाभाडे यांचा मुलगा अनिल याससुध्दा गणेश नाना कोळी, कल्पना नाना कोळी व त्यांचे सोबत इतर दोन जणांनी मारहाण करून खिशातून 10 हजार रुपये जबरीने काढून घेतलेत़ 50 हजार रुपयांची चेनसह एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज काढून नेला़
प्रल्हाद दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात भादंवि कलम 395, 341, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे रस्ता अडविणे, दरोडा व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आह़े