‘ती’ला घरात आणून पत्नीवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:24 IST2017-10-23T14:24:39+5:302017-10-23T14:24:39+5:30

महिलेची फिर्याद : धडगाव तालुक्यातील प्रकार

'She' brought her home to wife and said | ‘ती’ला घरात आणून पत्नीवर वार

‘ती’ला घरात आणून पत्नीवर वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रुकचा जेलसिंगपाडा येथे पत्नी असताना दुसरे लगA करण्यासाठी बाई घरात आणणा:या पतीने पत्नीवर काचेच्या ग्लासने वार करत जखमी केल़े 
जेलसिंगपाडा येथील फत्तेसिंग नारसिंग पावरा याला दुसरे लगA करावयाचे असल्याने त्याने घरात पत्नी घरात असतानाच दुस:या महिलेला घरी आणले होत़े यावेळी त्याची पत्नी वंदना पावरा हिने विचारणा करून या गोष्टीला विरोध केला़ यावेळी फत्तेसिंग  याने वंदनाबाई हिला घरातून निघून जाण्याचे सांगितले, तसे न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ मात्र वंदनाबाई घरातून गेली नाही, याचा राग आल्याने फत्तेसिंग याने घरातील काचेचा ग्लास वंदनाबाई हिच्या डोक्याच्या मागे फोडून त्यास दुखापत केली़ तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ 
डोक्याच्या मागील भागात जखम होऊनही रात्री वाहनाची सोय नसल्याने संबधित महिला ही घरी थांबली, दुस:या दिवशी पायपीट करत धडगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार कथन करून संशयित पती फत्तेसिंग पावरा याच्याविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े वंदनाबाई हिच्यावर उपचार करण्यात आल़े 
 

Web Title: 'She' brought her home to wife and said