अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:22 IST2019-12-23T12:22:37+5:302019-12-23T12:22:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेत रविवारी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. दत्त मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी ...

'Shan' wins in horse racing | अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ने मारली बाजी

अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेत रविवारी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. दत्त मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.
सारंगखेडा येथील यात्रेत पहिल्या रविवारप्रमाणेच दुसऱ्या रविवारीही यात्रा भाविकांच्या गर्दीने फुल्ल झाली होती. सकाळपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती. एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. अनरद रस्ता व टाकरेखडा गावापर्यंत भाविकांच्या वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीतही मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व मारवाडी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहावेळा आॅल इंडिया चॅम्पियन ठरलेल्या ‘शान’ घोड्यानेही सहभाग नोंदवला. हा घोडा सातव्यांदा आपला मान अबाधीत ठेवतो का याबाबत अश्वशौकीनांमध्ये उत्सुकता लागून होती. या स्पर्धेत ४० स्पर्धकांमधून ‘शान’ने प्रथम क्रमांक पटकावून सातव्यांदा आॅल इंडिया चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. घोडे मालकाला मान्यवरांच्या उपस्थितीत ७१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन ‘शान’ घोडा व त्याच्या मालकाला सन्मानीत करण्यात आले. या घोड्याला पाहण्यासाठी अश्वशौकीनांची गर्दी झाली होती.

सारंगखेडा यात्रेला ११ डिसेंबरपासून सुरुवात झाली. यात्रेतील घोडे बाजारात पहिल्या दिवसापासूनच तेजी आहे. रविवारीही ३२ घोड्यांची विक्री होऊन त्यातून १४ लाख १४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. आजअखेर तीन हजार घोड्यांची आवक झाली असून ७६४ घोड्यांची विक्री झाली. यातून तीन कोटी दोन लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

Web Title: 'Shan' wins in horse racing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.