शहाद्यात तरुणीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 9, 2017 23:30 IST2017-03-09T23:30:57+5:302017-03-09T23:30:57+5:30
नंदुरबार : तरुणीला एकटी गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना शहादा येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली.

शहाद्यात तरुणीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा
नंदुरबार : तरुणीला एकटी गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना शहादा येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी मलोणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील गरीबनवाज कॉलनी, गॅस गोडावूनजवळ राहणारी १९ वर्षीय तरुणी मोबाइल रिचार्ज करण्यासाठी मलोणी येथे जात असताना वॉटर फिल्टर समोर तिला विनोद कडू निकुंभे (२८) याने अडविले. तिच्याशी अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केला. या वेळी तरुणीने आरडाओरड केल्यानंतर त्या भागातून जाणाºया मोटारसायकलस्वारांनी तिला त्याच्या तावडीतून सोडविले.
याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद कडू निकुंभे रा.समतानगर, मलोणी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.