व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहाद्यात सेतू केंद्राची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:41 IST2019-06-08T12:41:19+5:302019-06-08T12:41:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्ह्यातील विद्याथ्र्यासाठी सेतू ...

Shahadat Setu Center for Access to Professional Course | व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहाद्यात सेतू केंद्राची सोय

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहाद्यात सेतू केंद्राची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्ह्यातील विद्याथ्र्यासाठी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे कामकाज 11 जूनपासून सुरू होणार आहे. 
तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागामार्फत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक परीक्षा घेतली जाते. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील विद्याथ्र्याकरीता शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. 
याअंतर्गत 7 जूनपासून विद्यार्थी महासेट या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर नोंदणी करतील. नोंदणीननंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये पूर्वनियोजित वेळेत जातील. केंद्रात ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासह इतर प्रक्रिया पार पडतील. या सर्व प्रक्रिया ‘सार पोर्टल’वर करण्यात येतील.  त्याकरीता केंद्रात 30 संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले असून आठ स्कॅनर आणि तीन ते चार प्रिंटरची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. या केंद्राचे समन्वयक म्हणून प्रा.विजय पाटील व प्रा.चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
जिल्ह्यात केवळ याच महाविद्यालयात एव्हढी सुविधा असल्याने येथे केंद्र मंजुर करण्यात आले आहे. याशिवाय अक्कलकुवा येथील जामिया इन्स्टीटय़ूटमध्येही अशा प्रकारचे सेतू केंद्र मंजुर असले तरी तेथे सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. 
दरम्यान, विद्यार्थी व पालकांनी निर्धारित वेळेतच केंद्रात यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

Web Title: Shahadat Setu Center for Access to Professional Course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.