शहाद्यातील घटना : तरुणीच्या फिर्यादीवरून विनयभंग गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:53 IST2018-07-19T12:53:22+5:302018-07-19T12:53:27+5:30

शहाद्यातील घटना : तरुणीच्या फिर्यादीवरून विनयभंग गुन्हा दाखल
नंदुरबार : तरुणीस अलि निरोप देवून तिचा विनयभंग करणा:या शहादा येथील एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील स्विपर कॉलनीत राहणारी 25 वर्षीय तरुणीला कल्पनानगरमध्ये राहणारा तरुण अलि निरोप पाठवित होता. 16 रोजी सायंकाळी त्याने एका महिलेमार्फत पुन्हा संबधीत तरुणीला अलि निरोप पाठविला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने आपल्या भाऊला ही बाब सांगितली. भाऊने शहनिशा केल्यानंतर तरुणाला अद्दल घडविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणीच्या फिर्यादीवरून राकेश मक्कन पाटील, रा.कल्पनानगर याच्याविरुद्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील व पोलीस निरिक्षक संजय शुक्ला करीत आहे.