शहाद्यात घरफोडी, ५० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 21:05 IST2019-02-13T21:05:33+5:302019-02-13T21:05:37+5:30
नंदुरबार : शहाद्यातील आयोध्या नगरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. शहादा पोलिसात गुन्हा दाखल ...

शहाद्यात घरफोडी, ५० हजारांचा ऐवज लंपास
नंदुरबार : शहाद्यातील आयोध्या नगरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोध्या कॉलनीत ठेकेदार ईश्वर संजय मराठे हे राहतात. त्यांच्या घराचा बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटातून चोरट्यांनी सोन्याची चेन व रोख रक्कम असा एकुण ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. सकाळी घरफोडी लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली.
पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत ईश्वर संजय मराठे यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.