शहाद्यातील घरफोडीत ८२ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:57 IST2019-05-11T11:57:09+5:302019-05-11T11:57:31+5:30

बंद घराची साधली संधी : गस्त वाढीची मागणी

 Shahada's house collapsed with 82 thousand rupees | शहाद्यातील घरफोडीत ८२ हजारांचा ऐवज लंपास

शहाद्यातील घरफोडीत ८२ हजारांचा ऐवज लंपास

नंदुरबार : शहाद्यात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व दागीने असा ८२,६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ८ रोजी रात्री घडली. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाद्यातील दशरथनगरात राहणारे अशोक लक्ष्मण नागदेवते हे कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. बंद घराची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील सात हजार रुपये रोख आणि सोने चांदीचे दागीने असा एकुण ८२ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ९ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत अशोक लक्ष्मण नागदेवते यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार नरवाडे करीत आहे.
दरम्यान, सध्या सुट्यांमुळे अनेक घरे बंद राहत असल्यामुळे चोरटे संधी साधत आहेत. त्यामुळे गावी जातांना घरात किंमती वस्तू न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title:  Shahada's house collapsed with 82 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.