शहाद्यात महिलेचा विनयभंग करुन मुलीची छेड काढण्याची दिली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:12 IST2019-04-12T12:11:55+5:302019-04-12T12:12:26+5:30
पिडितेची फिर्याद : तिघांविरोधात गुन्हा दाखल

शहाद्यात महिलेचा विनयभंग करुन मुलीची छेड काढण्याची दिली धमकी
नंदुरबार : महिलेचा विनयभंग करुन तिच्या मुलीबद्दल अपशब्द वापरुन दोघींचा पुन्हा विनयभंग करुन धमकी देण्याचा प्रकार शहादा शहरात घडला़ 2 आणि 4 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़
लोणखेडा येथील गणेश नगरात वास्तव्यास असलेली महिला एका राजकीय पक्षात कार्यरत आह़े याच पक्षाचे काम करणा:या निलेश पाटील रा़ सालदार नगर याने 2 एप्रिल रोजी महिलेस फोन करुन शिवीगाळ करत धमकी दिली होती़ यावेळी त्याने ‘तुझी मुलगी एकांत ठिकाणी सापडल्यावर तुमच्या दोघांचा विनयभंग करु’ असे सांगून शिवीगाळ केली होती़ दरम्यान 4 एप्रिल रोजी पिडित महिला सकाळी 10 वाजता लोणखेडा रस्त्यावरुन जात असताना हरीयाअली गेटसमोर निलेश पाटील याच्यासह दोघे त्याठिकाणी आले होत़े पिडितेस थांबवून त्यांनी हात पकडून शिवीगाळ करत फिर्याद दिल्याने मुलीबद्दल अपशब्द वापरुन ओढाताण केली होती़ महिलेने आरडओरड केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरुन पळून गेले होत़े या प्रकाराने भयभीत झालेल्या पिडितेने बुधवारी दुपारी शहादा पोलीस ठाण्यात संशयित निलेश पाटील व अन्य दोघे अनोळखी यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत़ या प्रकाराने शहादा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून काम करत असलेल्या राजकीय पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यास उशिर झाल्याचे पिडीत महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े