शहाद्यातील घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 11:59 IST2019-02-21T11:58:47+5:302019-02-21T11:59:11+5:30
नंदुरबार : शहाद्यातील वृंदावन कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १९ रोजी ...

शहाद्यातील घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास
नंदुरबार : शहाद्यातील वृंदावन कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १९ रोजी रात्री घडली.
वृंदावन कॉलनीत राहणारे योगेश केसरीमल बेदमुथा यांचा बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील एक लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली. सकाळी ही घटना उडकीस आली. याबाबत योगेश बेदमुथा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शेख करीत आहे.