वडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्नवडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:16 IST2019-09-07T12:16:41+5:302019-09-07T12:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वडछील येथे गणेश विसजर्नादरम्यान सहा युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहादा तालुका सुन्न झाला ...

Shahada taluka sunnavad due to father accident | वडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्नवडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्न

वडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्नवडछील दुर्घटनेमुळे शहादा तालुका सुन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील वडछील येथे गणेश विसजर्नादरम्यान सहा युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहादा तालुका सुन्न झाला आह़े वडछील गावातील एकाच गल्लीतील सहा युवकांच्या मृत्यूने गवळीवाडा शोकात बुडाला आह़े रात्री उशिरा गावातून एकाच वेळी निघालेल्या सहा अंत्ययात्रेमुळे गावात अश्रुंचा महापूर आला होता़             
वडछील येथील गवळीवाडय़ात  पारंपरिक पशुपालन हा व्यवसाय करणा:या चित्रकथे कुटूंबांचा रहिवास आह़े दुग्धव्यवसाय करणारी ही 40 कुटूंबे एकमेकांचे भाऊबंद आहेत़  त्यांच्याकडून सर्वच सणवार एकत्रपणे साजरे करण्यात येतात़ येथील युवकांनी जय मल्हार गणेश मंडळाची स्थापना केली असून  युवकांकडून दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो़  यंदाही उत्सव साजरा करण्याचे नियोजन होत़े परंतू भाऊबंदकीतील लक्ष्मीबाई शरद चित्रकथे यांचे निधन झाल्याने शोककळा पसरली होती़ यामुळे  गणपती विसजर्नाचा निर्णय मंडळाने घेतला होता़ शुक्रवारी दुपारी  चार वाजेच्या सुमारास मंडळाचे युवक कार्यकर्ते गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील कमरावद येथील गाव तलावाकडे खाजगी मालवाहू वाहनातून गणेश मूर्ती घेऊन गेले होत़े  सुमारे 50 फूट लांब आणि 30 फूट रुंदीच्या या तलावाची खोली साधारण 15 फूट होती़ म्हसोबा तलाव म्हणून परिचित असलेल्या या तलावात मूर्तीचे विसजर्न करण्यासाठी 9 ते 10 युवक उतरले होत़े यानंतर काही वेळातच त्यांच्या किंकाळ्या आणि आरोळ्या येऊ लागल्याने  काठावरील युवकांनी गावात माहिती दिली आणि आक्रोश सुरु झाला़ मयतांच्या कुटूंबियांना शोक अनावर झाल्याने त्यांची शुद्ध हरपली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह अधिका:यांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली़ यावेळी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल करणसिंग वळवी यांनी पंचनामा केला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी तातडीने वडछील गावाजवळील घटनास्थळ आणि म्हसावद ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली़ त्यांनी वडछील गावातील चित्रकथे कुटूंबातील सदस्यांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली़ पोलीस कारवाई तातडीने पूर्ण करुन मृतदेह त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्याच्या सूचनाही केल्या़ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात डॉ़ गोविंद शेल्टे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेंद्र पेंढारकर, डॉ़ मोहन पटेल, सचिन पटेल, डॉ़ कल्पेश पटेल यांनी शवविच्छेदन केल़े म्हसावद ग्रामीण रुग्णालयात सर्व सहा मयतांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्याचा मालवाहूचा वापर करण्यात आला ज्यातून बाप्पाला आणले गेले होत़े मृतदेहांना पाहून त्यांच्या कुटूंबियांकडून प्रचंड आक्रोश सुरु होता़ आई-वडील,पत्नी आणि मुलगा यांच्या आरोळ्यांनी परिसर अक्षरश: थरारला होता़ वाहनाच्या मागे धावणा:या या कुटूंबातील सदस्यांना आवरण्यासाठी अनेकांची होणारी धावपळ तसेच किंकाळ्या यामुळे हा परिसर स्मशानासारखाच भासत होता़ घटनेत मयत झालेल्या रविंद्र चित्रकथे याच्या पश्चात 1 मुलगा आणि मुलगी असा परिवार आह़े त्यांचा मुलगा घटनास्थळी आल्यानंतर त्याने वडीलांचे मृत शरीर पाहून केलेल्या आक्रोशामुळे इतरांनाही रडू कोसळले होत़े मयत दीपक चित्रकथे याचे गेल्यावर्षीच लगA झाले होत़े त्याची पत्नी चार महिन्याची गर्भवती आह़े त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या पत्नीचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता़ दरम्यान म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनावेळी मयतांच्या कुटूंबियांचा आक्रोश कायम होता़ याठिकाणी तालुक्याच्या विविध भागातील नागरिकांनी उपस्थिती  देत त्यांचे सांत्त्वन करण्याचा प्रयत्न केला़ घटनेत मयत झालेले दीपक आणि सचिन हे दोघे सख्खे भाऊ होत़े त्यांच्या मृत्यूची माहिती समजल्यावर दोघांचे वडील सुरेश चित्रकथे बेशुद्ध पडले होत़े तर मयत सागर अप्पा चित्रकथे यांचा एकुलता एक मुलगा होता़   गवळीवाडय़ातील सुरेश, अप्पा आणि  मंगल चित्रकथे हे तिघे सख्खे भाऊ असून तिघांची मुले या घटनेत मृत झाली़ तिघांच्या घरासमोर सायंकाळनंतर नातेवाईकांची गर्दी होऊन रडारड सुरु होती़ रात्री 9 वाजेच्या सुमारास सहा जणांचा मृतदेह आणले गेल्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टरमधूनच त्यांची अंत्ययात्रा काढली होती़ एकाच ट्रॅक्टरमधून सहा जणांची अंत्ययात्रा पाहून गावातील ग्रामस्थ भावूक झाले होत़े नातेवाईक, ग्रामस्थ, समाजबांधव, तालुका आणि जिल्ह्यातील सेवाभावी यांची गर्दी झाली होती़ दरम्यान याठिकाणी पोलीस कर्मचा:यांसह राज्य राखीव दलाचे जवानांचे पथक तैनात करण्यात आले होत़े 

Web Title: Shahada taluka sunnavad due to father accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.