शहादा तालुक्यात पिके गेली पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:00 IST2019-09-19T12:00:27+5:302019-09-19T12:00:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर व तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती़ दीड ...

In Shahada taluka, crops are gone in the water | शहादा तालुक्यात पिके गेली पाण्यात

शहादा तालुक्यात पिके गेली पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहर व तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती़ दीड तास कोसळलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतशिवाराला बसला असून पिकांमध्ये पाणी साचून नुकसानीची भिती व्यक्त होत आह़े तालुक्याच्या विविध भागात सायंकाळर्पयत पाऊस हजेरी लावत होता़ 
शहादा शहर 
शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाट व जोरदार वा:यांच्या सोबतीने पावसाने हजेरी लावली़ 25 मिनिटे मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होत़े दोन दिवसापासून उघडीप देणा:या पावसाने बुधवारी दिलेल्या मुसळधार हजेरीमुळे साचलेल्या डबक्यांच्या पाण्यात पुन्हा वाढ होऊन रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले होत़े सकाळपासून उन्हामुळे अनेक महिलांनी घरातील भांडी व कपडे धुण्यासाठी काढली होती़ दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने महिलांची धावपळ उडाल्याचे दिसून आल़े शहरातील सर्व वसाहती, शाळा, शासकीय कार्यालयांच्या आवारात पाणी साचून तळे निर्माण झाले होत़े नव्याने तयार करण्यात आलेल्या तहसील कार्यालयाची इमारतीलाही नाल्याच्या पाण्याचा वेढा पडल्याने तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सायंकाळर्पयत कार्यालयाबाहेर पडू शकले नव्हत़े
पावसामुळे दोंडाईचा रोडवरील भेंडवा नाल्याच्या पुलाच्या परिसरात पाणी वाढल्याने या भागातून प्रवास करणा:यांचे हाल झाल़े पोलीस ठाणे आवारात पाणी गेल्याने तेथील नागरिकांनाही समस्येस सामोरे जावे लागल़े 
सारंगखेडा 
सारंगखेडा व परिसरातील कळंबू, कहाटूळ, कौठळ, पुसनद, अनरद या गावांमध्ये दुपारी साडेचार वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली़ शेतशिवार पूर्णपणे जलमय झाल्याने शेतात काम करणारे मजूर आणि शेतकरी यांचे हाल झाल़े पावसाचा जोर वाढत असल्याने शहादा-दोंडाईचा मार्गावरुन धावणारी वाहने सारंगखेडा व परिसरात अर्धा तासापेक्षा अधिक काळ थांबून होती़ 
दुपारी शेतशिवारात फवारणी करण्यासह ुइतर कामात शेतकरी व्यस्त होत़े अत्यंत महागडी अशी किटकनाशके शेतक:यांनी खरेदी करुन पिकांवर फवारली होती़ पावसामुळे ही कीटकनाशके वाया गेली आहेत़ शेतक:यांना उन्हाळी कापसाच्या थोडय़ाफार अपेक्षा होत्या़ परंतू बुधवारी झालेल्या पावसामुळे  त्या संपुष्टात आल्याची स्थिती आह़े शेतांमध्ये साचून असलेले पाणी कमी होण्याची चिन्हे नसल्याने कापूस बोंडे आणि झाडे सडू लागली आहेत़ धान्य पिकांचीही स्थिती गंभीर आह़े मोठा खर्च करुन या भागातील शेतक:यांनी पेरणी केलेल्या सर्वच पिकांची वाताहत होत असल्याने संकट वाढले आह़े 
म्हसावद
म्हसावद,सुलवाडे,सुलतानपूर ,पिंपरी,पाडळदा परिसरात एक तास मुसळधार पाऊस  पडला. दोन दिवसापयर्ंत कडक ऊन होत़े परिणामी शेतकरीवर्ग आंतरमशागतीत व्यस्त होत़े तसेच काही ठिकाणी लवकर लागण केलेल्या कापसाच्या शेतात कापूस वेचणीही सुरू होती. मात्र अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतक:यांसह ग्रामस्थांची धावपळ उडाली़ दरम्यान पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आह़े 
परिवर्धे
परिवर्धे परीसरात दुपारी वादळीवा:यासह पावसाने हजेरी लावली़ अर्धातास झालेल्या मुसळधार पावसानंतर रिपरिप सुरु झाली. वा:यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता़ गत दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामे वेगात सुरु होती़ मशागतीची कामे सुरु असतानाच पाऊस कोसळल्याने पुन्हा पिके पाण्यात गेली आहेत़ वादळी वा:यामुळे केळी, पपई, मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े नदीच्या उगम क्षेत्रात पाऊस कोसळल्याने नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े 
बामखेडा
बामखेडा, वडाळी,तोरखेडासह पावसामुळे शेतक:यांच्या चिंता वाढल्या आहेत़ 2 महिन्यापासून सुरु असलेल्या सततच्या सततच्या पावसामुळे  शेतीउत्पन्न घटल्याची चिन्हे आहेत़ मूग, मका, सोयाबीन, पपई या पिकांच मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े  मे महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकाचे बोंड हे सडत असून पिके पिवळी पडु लागली आहेत. येत्या दिवसात पावसाने विश्रांती न दिल्यास पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आह़े पावसामुळे तोरखेडा ते वडाळी दरम्यानच्या ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गाची व शेतशिवारातील पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आह़े 
 

Web Title: In Shahada taluka, crops are gone in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.