शहादा तालुक्यात उत्पादन अवैध मद्यासह मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:05 IST2019-09-28T12:05:15+5:302019-09-28T12:05:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील होळ गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गावठी दारुसह रिक्षा ताब्यात घेतली़ ...

शहादा तालुक्यात उत्पादन अवैध मद्यासह मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील होळ गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गावठी दारुसह रिक्षा ताब्यात घेतली़ शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली़
एमएच 39 जे 5843 या वाहनातून होळ मोहिदा रस्त्याने अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने होळ बसस्थानकाजवळ वाहन थांबवले असता, वाहनातून सहा टय़ूब गावठी दारु जप्त करण्यात आली़ पथकाने वाहनचालक निहाल अहमद साहेबखान अहमद रा़ फत्तेपूर याला ताब्यात घेतले आह़े ही कारवाई खेडदिगर सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक ए़डी़देशमाने, दुय्यम निरीक्षक जगदीश भांबुरे, मोहन पवार, कपिल ठाकूर यांनी केली़