शहादा नगरपालिकेतर्फे 73 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:25 IST2018-10-11T12:25:54+5:302018-10-11T12:25:57+5:30

शहादा नगरपालिकेतर्फे 73 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त
शहादा : प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत बुधवारी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 73 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शहादा पालिकेने प्लास्टिक निमरूलन पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने बुधवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरात धडक कारवाई करत 73 किलो प्लास्टिक जप्त केले. या कारवाई अतंर्गत मुख्य बाजारपेठ ते शेरे पंजाब कडील रस्त्यालगत लहान मोठे किराणा दुकानदार, कपडे विक्रते, जनरल स्टोर्सवाल्यांकडून एकूण 73 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
या पुढे दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास पहिल्यावेळी पाच हजार, दुस:या वेळी आढळल्यास दहा हजार ते 25 हजार रुपयांपयर्ंत दंड वसूल करण्यात येईल. तसेच दुकानाचा परवाना रद्द होवून तीन ते सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकेल, असा ईशारा पालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी दिला आहे.
प्लास्टीक निमरूलन पथकात स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, आस्थापना विभाग प्रमुख चेतन गांगुर्डे, सहाय्यक गोटूलाल तावडे, स्वच्छता विभागातील कर्मचारी केदार सोलंकी, शंकर वाघ, रहिम बेग, सागर साळूंके, गणेश मोरे, आकाश वाघ व तसेच दुकान निरीक्षक सहा.दीपक आगळे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी प्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एच.डी.एफ.सी बँकेच्या सहकार्याने शासन निर्णयाव्दारे, बंदी असलेले व वापरण्यास मान्यता असलेल्या प्लास्टीक, थमाकॉलच्या वस्तूंचे जनजागृतीपर फलक उभारण्यात येणार आहेत.