नंदुरबार : शहादा शहरातील बाजारात कामानिमित्त आलेल्या व्यापाºयाच्या बॅगेतून पैसे लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़ या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे़अहमदाबाद येथील कन्हैय्यालाल बाबुलालजी रावल हे कामानिमित्त बुधवारी शहाद्यात आले होते़ दरम्यान दुपारी शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील गिरीश कलेक्शनसमोरुन जात असताना त्यांच्या बॅगेत ठेवलेले ३६ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले़ कन्हैय्यालाल रावल यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक वळवी करत आहेत़ शहरात भुरट्या चोरांच्या कारवाया वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे़
शहाद्यात व्यापाऱ्याच्या बॅगेतून पैसे लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:16 IST