शहादा मासिक पाळी व्यवस्थापन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:25+5:302021-02-12T04:29:25+5:30

कार्यक्रमास डाएटचे विषय सहायक प्रकाश भामरे, उपमुख्याध्यापक संजय भोई, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभना पटेल यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या. पुढे बोलताना ...

Shahada Menstruation Management Camp | शहादा मासिक पाळी व्यवस्थापन शिबिर

शहादा मासिक पाळी व्यवस्थापन शिबिर

कार्यक्रमास डाएटचे विषय सहायक प्रकाश भामरे, उपमुख्याध्यापक संजय भोई, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभना पटेल यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, वयात आल्यानंतर मुलींना मासिक पाळी सुरू होते. यावेळी विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय, त्या काळातील स्वच्छता, आरोग्य, आहार-विहार, अंधश्रद्धा आणि गैरसमज आदी विषयी चर्चा आणि मार्गदर्शन केले. कार्यशाळेत केवळ व्याख्यान न देता खेळ, चर्चा याद्वारे खेळीमेळीच्या वातावरणात मुलींशी संवाद साधण्यात आला. मुलींच्या विविध शंकांचे निरसनही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यात आले. शिक्षिका सुनीता पाटील यांनी वयात आल्यानंतर मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेला विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वंदना चौधरी यांनी तर आभार मीनाक्षी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shahada Menstruation Management Camp