बलात्कार प्रकरणी शहादा न्यायालयाकडून आरोपीस सक्तमजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:45 IST2019-02-12T18:45:15+5:302019-02-12T18:45:41+5:30
नंदुरबार : रात्रीच्या वेळी महिला व तिच्या लहान मुलांना चाकूने ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस शहादा ...

बलात्कार प्रकरणी शहादा न्यायालयाकडून आरोपीस सक्तमजुर
नंदुरबार : रात्रीच्या वेळी महिला व तिच्या लहान मुलांना चाकूने ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस शहादा न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी व ११ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.
जयसिंग भामट्या पावरा, रा.बिलगावचा कोनभीचापाडा, ता.धडगाव असे आरोपीचे नाव आहे. १३ मार्च २०१७ रोजी कोनभीचापाडा येथे राहणाºया महिलेचा पती होळी पहाण्यासाठी दुसºया गावी गेला होता. त्यावेळी महिला कुडाच्या घरात आपल्या दोन लहान मुलांसह झोपली होती. ही संधी साधत मध्यरात्री दारूच्या नशेत जयसिंग पावरा याने गुपचूप दरवाजा उघडून महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला असता त्याने चाकूचा धाक दाखवत दोन्ही मुलांना ठार मारण्याची धमकी देत जबरीने अत्याचार केला. ही बाब कुणालाही सांगू नये, आपण सरपंचाचा भाऊ आहे. असे सांगून तो तेथून पसार झाला. महिलेने पतीला ही घटना सकाळी सांगितली. धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फौजदार नारायण चव्हाण यांनी शहादा अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या.पी.बी.नाईकवाड यांनी पावरा यास दोषी ठरवत दोन वर्ष सश्रम कारावास व ११ हजाराचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पुरुषोत्तम सोनार होते.