प्रशासनाच्या कारवाईनंतर शहादा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:24 IST2020-03-24T12:24:27+5:302020-03-24T12:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात बसलेल्या नागरिकांनी सोमवारी मात्र घराबाहेर पडत रस्त्यांवर ...

प्रशासनाच्या कारवाईनंतर शहादा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात बसलेल्या नागरिकांनी सोमवारी मात्र घराबाहेर पडत रस्त्यांवर गर्दी केल्याचे चित्र सकाळी निर्माण झाले होते. शहरात १४४ कलम लागू करण्यात आल्याची आठवण देत महसूल व पोलीस अधिकारी शहरातील विविध भागातील नागरिकांना घराबाहेर पडू नका, पाच लोकांपेक्षा जास्त जणांनी एकत्रित येऊ नका असे, आवाहन केल्यानंतर शहरातील व्यवहार पूर्णपणे बंद झाले होते.
सोमवारी सकाळी भाजी मंडईत भाजीपाला विक्री सुरू झाल्यानंतर चढ्या भावाने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाला या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी भाजी मंडईत जाऊन विक्री बंद करण्याचे आदेश देण्यासह सामान जप्तीची कारवाई केली. त्याचप्रमाणे शहरात अत्यावश्यक सेवा व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेल्या जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. अशा दुकानावर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी दुकाने बंद करून कारवाई केली.
सोमवारी सकाळपासून शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने पोलीस पोलीस प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. याचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारनंतर संपूर्ण शहर बंद झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये 31 मार्चपर्यंत एस.टी. बससेवा बंद करण्यात आल्याने दुसºया दिवशीही शहादा आगारातून एकही बसफेरी झालेली नव्हती. सलग दोन दिवस शहादा आगार बंद होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
४कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून १४४ कलम लागू कारण्यात आला आहे. मात्र असे असताना देखील शहादा शहरातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाºयांनी दुकाने उघडल्याने शहरातील नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच काही व्यापारी याचा फायदा घेत चढ्या दराने भाजीपाला विक्री करीत होते. जमावबंदी आदेश असताना मोठ्या प्रमाणावर नागरिक जमल्याने पालिका व पोलीस पथकाने सर्व दुकाने बंद करीत भाजी मंडई परिसरात कारवाई केली. काही विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले तर काहींनी सावलीसाठी केलेली सोय काढण्यात आली.