शहादा खरेदी-विक्री संघात हरभरा खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:05+5:302021-02-23T04:48:05+5:30
धुळे ते सुरत महामार्गाच्या कामाला गती नंदुरबार : नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंतचा ...

शहादा खरेदी-विक्री संघात हरभरा खरेदीला सुरुवात
धुळे ते सुरत महामार्गाच्या कामाला गती
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंतचा १४० किलोमीटर धुळे ते सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले होते. गेल्या आठवड्यापासून महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवापूर ते धुळे अंतर दीड ते पावणेदोन तास लागणार आहे. यामुळे वेळेची व इंधनाची बचत होणार आहे.
ऊस वाहतुकीमुळे तापी पुलावर वाहतुकीचा खोंळबा
नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पुलावर ऊस वाहतूक करणार्या वाहनांमुळे दररोज वाहनाच्या खोळंबा होत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून, लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.