नंदुरबारचे शाहीर हरीभाऊ पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 13:07 IST2018-11-06T13:06:48+5:302018-11-06T13:07:02+5:30

नंदुरबार : शाहीर हरीभाऊ गणपत पाटील (९३) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले़ महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर साबळे यांच्या सहवासात ...

Shabir Haribhau Patil passed away | नंदुरबारचे शाहीर हरीभाऊ पाटील यांचे निधन

नंदुरबारचे शाहीर हरीभाऊ पाटील यांचे निधन

नंदुरबार : शाहीर हरीभाऊ गणपत पाटील (९३) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले़
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर साबळे यांच्या सहवासात हरिभाऊ पाटील यांची शहिरी प्रगल्भ झाली़ स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीवरील त्यांचे अनेक पोवाडे गाजले होते़ राष्ट्रसेवा दल, स्काऊट गाईड, शहीदस्मृती, लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय, हरिजन सेवक संघ अशा विविध संस्थांशी ते निगडीत होते़ नंदुरबार जिल्हानिर्मितीनंतर जिल्ह्याचे पहिले स्काऊट आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती़ त्यांच्या पश्चात पत्नी उषाबाई पाटील आहेत़
मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे़

Web Title: Shabir Haribhau Patil passed away