बोलक्या भिंतीआड बालभवितव्याला आकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:04 PM2020-02-15T13:04:03+5:302020-02-15T13:04:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माता भगिनींसह ग्रामस्थांच्या सहकार्यातून पूनर्वसित रेवानगर ता. तळोदा येथील अंगणवाडीच्या बोलक्या भिंती साकारण्यात आल्या ...

Shabby wall-shaped baby maid! | बोलक्या भिंतीआड बालभवितव्याला आकार!

बोलक्या भिंतीआड बालभवितव्याला आकार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माता भगिनींसह ग्रामस्थांच्या सहकार्यातून पूनर्वसित रेवानगर ता. तळोदा येथील अंगणवाडीच्या बोलक्या भिंती साकारण्यात आल्या आहे. या भिंतीमुळेच अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या वाढली असून तेथे कृषी, व्यापार, पर्यावरण व सांस्कृतिकदृष्ट्या प्रतिभावंत बालक घडविले जात आहे.
गाव तथा देश विकासातील पहिली पातळी ठरणाºया अंगणवाडी केंद्राचे रुप बदलून बालकांमध्ये अंगणवाडीबद्दल आवड निर्माण करण्यासाठी रेवानगर अंगणवाडी केंद्र क्र.४ येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. तेथील अंगणवाडी सेविका सुनिता पोपट पावरा व मदतनीस कागीबाई वंसत पावरा हे अंगणवाडी विकासासाठी दर १५ दिवसांनी गावातील माता, किशोरवयीन मुली व ग्रामस्थांची बैठक घेत आहे. या बैठकीत माता व मुलींच्या विकासासह आहाराबाबत चर्चा केली जात असली तरी प्रतिभावंत बालक घडविण्यासाठी अधिक भर दिला जातो. योजना राबवितांना अडचण आल्यास ग्रामस्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदतीला येतात. त्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी या कर्मचाºयांना फारशी झळ पोहोचत नाही.
ग्रामस्थांच्या मदतीनेच बोलक्या भिंती साकारण्यात आल्या टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम राबवत माता, किशोरी मुली व ग्रामस्थांच्या मदतीनेच अनेक वस्तूही तयार करण्यात आल्या आहे. त्याद्वारे केंद्रातील बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीबद्दल बालकांमध्ये गोडी निर्माण झाली असून नियमित उपस्थित राहणाºया बालकांच्या संख्येत भर पडली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून प्रतिभावंत बालक घडविण्यावर विशेष भर दिला जात असून अंगणवाडी नव्हे बालसंस्कार केंद्र असल्याचेही पालकांमधून म्हटले जात आहे.
बाजारपेठेतील धान्य व्यापारावर माहिती देत खाद्य संस्कृतीवर मार्गदर्शन करण्यात येत असल्याने या बालकांना आहार तथा पोषणाबाबतही अप्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे. चित्रांच्या माध्यमातून जंगल साकारत जंगली प्राणी व वनातील झाडे झुडूपांची देखील ओळख करुन दिली जात आहे. त्यामुळे बालकांमध्ये प्रगल्भता वाढीस लागत असल्याने पालकांमधून या कर्मचाºयांचे कौतुक होत आहे.

Web Title: Shabby wall-shaped baby maid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.