नंदुरबारात झालेल्या विचित्र अपघातात सतरा वर्षीय तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:13 IST2019-05-16T13:13:50+5:302019-05-16T13:13:54+5:30

नंदुरबार : नंदुरबार येथील कल्याणेश्वर मंदिराजवळ झालेल्या विचित्र अपघातात शहरातील कंजरवाडा परिसरात राहणारी १७ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला़ ...

Seventeen year old woman killed in a strange accident in Nandurbar | नंदुरबारात झालेल्या विचित्र अपघातात सतरा वर्षीय तरुणी ठार

नंदुरबारात झालेल्या विचित्र अपघातात सतरा वर्षीय तरुणी ठार


नंदुरबार : नंदुरबार येथील कल्याणेश्वर मंदिराजवळ झालेल्या विचित्र अपघातात शहरातील कंजरवाडा परिसरात राहणारी १७ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला़ अपघातात इतर ५ जण जखमी झाले आहे़
बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे पासिंग असलेले चारचाकी वाहन (क्रमांक एमएच १८ पी ०३५६) भरधाव वेगात येत असताना समोरुन येणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा (क्रमांक एमएच ३९ जे ४९२३), स्कूटी (क्रमांक एम़एच़ ३९़ ५८७०), अ‍ॅक्टीव्हा, (क्रमांक एम़एच़ ३९ क्यू २७९१), शाईन दुचाकी (क्रमांक एम़एच़ ३९ ए़ई़३०५९) यांना धडक दिली़ यात स्कूटीवर असलेल्या प्रतीभा मच्छले (१७) ही गंभीर जखमी झाली़ तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, तीला मृत घोषित करण्यात आले़ दरम्यान, इतर चार जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, स्कार्पियो चालक वाहन सोडून पसार झाला़ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Seventeen year old woman killed in a strange accident in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.