दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली सौदीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:18 IST2019-04-14T12:17:58+5:302019-04-14T12:18:09+5:30

११० कंटेनर रवाना : १०० शेतकऱ्यांनी आठशेपेक्षा अधिक एकर क्षेत्रात राबविला प्रयोग

The seven-star banana was made in the rainy season | दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली सौदीला

दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली सौदीला

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी आपल्या शेतातील केळी सौदी अरेबियात निर्यात केली आहे़ आतापर्यंत जवळपास ११० कंटेनर रवाना झाले असून अजून महिनाभरात १५० पेक्षा अधिक कंटेनर केळी सातासमुद्रापार जाणार आहे़
जिल्ह्यात ऊसाबरोबरच पपई, मिरची आणि केळी हे बागायती पिके घेतली जातात़ बदलत्या काळाबरोबर शेतकºयांनीही आधुनिकतेची कास घेत आपली शेतीही हायटेक केली आहे़ त्याचे चांगले परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत़ विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांनी धाडस करुन गेल्या वर्षापासून निर्यातीसाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी काही कंपन्यांशी समन्वय साधून तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानुसार केळीची जोपासना करण्यासाठी गट तयार केला आहे़ गेल्यावर्षीचा अनुभव पाहता, यावर्षी या गटात मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी सहभाग घेतला आहे़ सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी जवळपास १२ लाख केळीच्या रोपांची लागवड केली होती़ त्याचे उत्पादन सुरु झाले असून ही केळी आता, निर्यात होऊ लागली आहे़
ब्राह्मणपुरी, पाडळदा, म्हसावद यासह इतर गावातील शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे पिके वाचवणे शेतकºयांसाठी अवघड होत असून अशा बिकट परिस्थितीतही केळी उत्पादक शेतकरी केळीची जोपासना करण्यात दिवसरात्र एक करीत आहेत़ त्याचे फलीत त्यांना दिसू लागले असून या केळींच्या बागांपुढे आता निर्यातीसाठी कंटेनर लागू लागले आहेत़ विशिष्ट पद्धतीने केळीच्या घडाची कापणी करुन त्यावर प्रक्रिया करीत केळीची पॅकिंग केली जात आहे़ यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे़

Web Title: The seven-star banana was made in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.