विसरवाडीत आलेले सात जण क्वारंटाईन कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:47 IST2020-04-30T12:47:45+5:302020-04-30T12:47:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाहेर गावाहून आलेल्या सात जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल ...

Seven people from Visarwadi were in the quarantine room | विसरवाडीत आलेले सात जण क्वारंटाईन कक्षात

विसरवाडीत आलेले सात जण क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाहेर गावाहून आलेल्या सात जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि कल्याण येथून गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे नागरिक आले होते़
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवापुर तालुका सतर्कता आणि उपाययोजना यामुळे कोरोनामुक्त आहे़ प्रशासनाकडून काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन होत आहे़ दरम्यान विसरवाडी येथील कुंभार गल्ली परिसरात राहणारी महिला मुलासह कल्याण येथे मुलीच्या सासरी गेली होती़ लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दोघेही तेथेच अडकून पडले होते़ परंतू मिळेल त्या वाहनातून महिला तिचा मुलगा, मुलगी, जावई आणि तीन महिन्यांची नात यांच्यासोबत गावी परत आले होते़ ही बाब ग्राम सुरक्षा दल व आशावर्कर यांच्या निर्दशनात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत यांना माहिती दिली होती़ त्यानुसार बुधवारी पहाटे पाच वाजता सर्व पाच जणांना सरपंच बकाराम गावीत, ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह कर्मचारी व ग्रामसुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करत तपासणी केली आहे़ कल्याण शहर रेड झोनमध्ये असल्या कारणाने पाचही जणांना दक्षता म्हणून नवापुर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे़ यापूर्वी विसरवाडी येथे अहमदाबाद येथून २४ रोजी गोसावी वाड्यातील दोघे आले होते़ त्यांनाही दक्षता म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे़ लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असताना एवढ्या लांबवर या सर्वांनी प्रवास केला कसा याबाबत चर्चा सुरु झाली आहे़
सर्व सात जणांच्या प्रकृतीवर विलगीकरण कक्षात लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आहे़

Web Title: Seven people from Visarwadi were in the quarantine room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.