पिंगाणे येथे एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:48+5:302021-01-22T04:28:48+5:30
जानेवारी महिन्यात पहिल्या २० दिवसात तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३७१ने वाढली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू ...

पिंगाणे येथे एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित
जानेवारी महिन्यात पहिल्या २० दिवसात तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३७१ने वाढली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांसह प्रशासन हवालदिल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर केलेल्या अहवालानुसार बुधवारी दोन टप्प्यात बामखेडा, ता.शहादा येथे एकाच दिवसात २१ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंगाणे येथे एकाच घरातील सात व्यक्ती कोविडने बाधित आढळले. बुधवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आरोग्य पथकासह गावाला भेट देऊन संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष पथक नियुक्तीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे नागरिकांच्या तपासणीसाठी ग्रामस्थांशी चर्चा करून स्वॅब तपासणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा केली. अचानक मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासन हवालदिल झाले असून जे नागरिक शासकीय नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे. मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या प्रत्येक गावात विशेष तपासणी आरोग्य शिबिरासह त्यांचे नमुने घेण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी दिली.