ऊसतोड कामगारांच्या मजूरीचे सात लाख रुपये ठेकेदाराने हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:01 IST2019-06-21T12:01:14+5:302019-06-21T12:01:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे आणि वावद येथून दौंड जि़ पुणे येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांची मजूरी न ...

ऊसतोड कामगारांच्या मजूरीचे सात लाख रुपये ठेकेदाराने हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे आणि वावद येथून दौंड जि़ पुणे येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांची मजूरी न देता त्यांचे साहित्य व बैलगाडय़ा हिसकावून घेत त्यांना हाकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
ढंढाणे येथील उषाबाई नाना बागुल यांच्यासह सात मजूर सप्टेंबर 2018 मध्ये दौंड येथील साखर कारखान्यात ऊसतोडीसाठी गेले होत़े त्यांना 214 रुपये प्रती टनाप्रमाणे मजूरी देण्याचे अमिष दाखवत ठेकेदार दौंड येथे घेऊन ेगेला होता़ दरम्यान ऊसतोड पूर्ण झाल्यानंतर सर्व सात जणांना देय असलेले 7 लाख 22 हजार रुपये देण्याऐवजी संबधितांनी अरेरावी केली़ यावेळी कामगार येथून घेऊन गेलेल्या बैलागाडय़ा, बैल बळजबरीने हिसकावून घेण्यात येऊन हुसकावले गेल़े नंदुरबार येथे परत आल्यानंतर मजूरांनी सातत्याने संपर्क करुनही पैसे दिले गेले नाहीत़ मजूर महिलांनी पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे चकरा मारुन निवेदने दिले होत़े परंतू कारवाई झालेली नाही़ अखेर महिलांनी तालुका पोलीस ठाण्यात आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला़
उषाबाई बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय रतन मोरे, अशोक रतन मोरे, मदन नारायण सूर्यवंशी रा़ वाडे ता़ भडगाव, भटू पतींग कदम रा़ चांभार्डी ता़ चाळीसगाव व अजरुन विठ्ठल टाकवणे रा़ पारगाव ता़ दौंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत़
सर्व कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांना दौंड येथून कोणत्याही प्रकारे पैसे न मिळाल्याने त्यांनी पायपीट आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करत नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे गाठले होत़े येथे आल्यावर विविध सामाजिक संघटनांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला होता़