तोरणमाळ येथील खडकी घाटात जीप कोसळली, सात जण ठार तर २० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST2021-01-24T04:14:43+5:302021-01-24T04:14:43+5:30

जखमींना उपचारासाठी तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीप ...

Seven killed, 20 injured in jeep crash | तोरणमाळ येथील खडकी घाटात जीप कोसळली, सात जण ठार तर २० जखमी

तोरणमाळ येथील खडकी घाटात जीप कोसळली, सात जण ठार तर २० जखमी

जखमींना उपचारासाठी तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीप चालकाचा घाट रस्त्यावर ताबा सुटल्याने जीप ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे. वाहनात २५ पेक्षा अधिक मजूर असल्याचे समोर येत आहे. अपघातात आतापर्यंत सात जण दगावले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गंभीर जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय व म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अतिगंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर तत्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले होते. तोरणमाळ वन विभागाचे कर्मचारी आणि म्हसावद पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

Web Title: Seven killed, 20 injured in jeep crash