कहाटूळ येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST2021-04-15T04:29:18+5:302021-04-15T04:29:18+5:30
या वेळी जि.प.चे माजी विजय दत्तू पाटील, पोलीस पाटील विजय दशरथ पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी. ...

कहाटूळ येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित
या वेळी जि.प.चे माजी विजय दत्तू पाटील, पोलीस पाटील विजय दशरथ पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी. पाटील, ग्रामस्थ व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत चार पुरुषांसाठी व चार स्त्रियांसाठी अशा एकूण आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून उपचारासाठी लागणारी औषधेही उपलब्ध आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात ज्या गावांना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या गावांमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यात सर्वच ठिकाणी गृह विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शहादा शहरासह परिसरात कोरोना सेंटर भरगच्च भरलेले आहेत. रुग्णांना जागाच मिळत नसल्याने त्या त्या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. या विलगीकरण कक्षांचा उपयोग करावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांनी केले आहे.