म्हसावद व वडाळी येथे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:49+5:302021-04-11T04:29:49+5:30

वडाळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने वडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत पुरुषांकरिता पाच व स्त्रियांसाठी पाच बेड असे ...

Separation Room at Mhaswad and Wadali | म्हसावद व वडाळी येथे विलगीकरण कक्ष

म्हसावद व वडाळी येथे विलगीकरण कक्ष

वडाळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने वडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत पुरुषांकरिता पाच व स्त्रियांसाठी पाच बेड असे १० बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. परिसरातील

ज्या कोरोना रुग्णांची घरात व्यवस्था होत नसेल अशा रुग्णांसाठी या सेंटरमध्ये व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून रुग्ण संख्या पाहून अजून पुढे बेडची वाढ करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना होमक्वारंटाईनहोण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून येथे क्वारंटाईन व्हावे. वडाळी प्राथमिक केंद्राच्या परिसरातील वडाळीसह तोरखेडा, फेस, बामखेडा, कुकावल, कोठली, जयनगर, खैरवे, खापरखेडा, कोंढावळ, जयनगर, काकर्दा आदी गावातील रुग्णांना या विलगीकरण कक्षाचा फायदा होणार आहे. कक्ष स्थापनेसाठी वडाळीचे सरपंच जयसिंग भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे, ग्रामविकास अधिकारी देसले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मोहने, पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांच्या परिश्रमाने ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Separation Room at Mhaswad and Wadali