बाहेरुन आलेल्या मजुरांचे झाडाखाली विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:28 IST2020-05-06T12:28:25+5:302020-05-06T12:28:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे गावाकडे परतत आहेत. शहादा तालुक्यातील ...

Separation of outside laborers under the tree | बाहेरुन आलेल्या मजुरांचे झाडाखाली विलगीकरण

बाहेरुन आलेल्या मजुरांचे झाडाखाली विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे गावाकडे परतत आहेत. शहादा तालुक्यातील चांदसैली व गोदीपूर येथील मजूर गावी येताच ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी त्यांना घरी जाऊ न देता गावालागतच असलेल्या शेतात झाडाखाली १४ दिवसांसाठी विलगीकरण करुन ठेवत आहेत.
शहादा तालुक्यातील शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतात व परजिल्ह्यात गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक मजूर तिकडेच अडकले. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने मजुरांवर मोठे संकट आले. गावी परत येण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन हे मजूर स्वत:च्या गावी येत आहे. शहादा तालुक्यातील चांदसैली येथे आजपर्यंत २० ते २५ मजूर परतले आहेत. त्यात काही मजुरांना त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे सोडण्यात आले. आजच्या घडीला १६ मजूर येथील शेतात झाडाखाली विलगीकरण करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हे मजूर दरवर्षी रोजगारासाठी जातात. विविध गावांमध्ये हे मजूर ऊसतोड करतात. विलगीकरण झालेले हे मजूर कुटुंब त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची, चहा व नाश्त्याची सोय करतात. गावाचे सरपंच हे किराणा सामानाची व्यवस्था करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सुलवाडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. विलगीकरण झालेल्या मजूर कुटुंबांना संपूर्ण गावाचे सहकार्य लाभत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाच्या सुरक्षतेसाठी सहा स्वयंसेवकांची ग्रामसुरक्षा दलाची आणि ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करून त्यामधील स्वयंसेवक आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. विलगीकरण केलेल्या मजुरांची काळजी सरपंच संजय पाडवी हे स्वत:हून घेत असून त्यांना जि.प. सदस्य जवरू पाडवी, पोलीस पाटील राज मुसळदे, ग्रामसेवक गोपाल गिरासे, शांतीलाल साळवे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.

Web Title: Separation of outside laborers under the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.