जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:22+5:302021-03-10T04:31:22+5:30

कार्यक्रमाs अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. ...

Separate room for female employees in the Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष

कार्यक्रमाs अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, या कक्षात महिला कर्मचाऱ्यांना भोजनाच्यावेळी एकत्र येऊन विचारांची देवाणBघेवाण करता येईल. कक्षात पिण्याचे शुद्ध पाणी व इतर आवश्यक सुविधा देण्यात येतील. कक्षाची रचना महिला कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात येईल. कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महेश पाटील म्हणाले, महिला दिन एक दिवस साजरा न करता वर्षभरात महिला कर्मचाऱ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम साजरे करावे. या वेळी वसुमना पंत, विधी अधिकारी दीपाली कलाल, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी पवार, लेखाधिकारी रुपाली पुंडे व नायब तहसलदार आशा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Separate room for female employees in the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.