बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:06 IST2020-01-31T12:05:55+5:302020-01-31T12:06:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवतीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकास शहादा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ...

Sentenced to rape case | बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास

बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : युवतीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकास शहादा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भोरकुंड, ता.अक्कलकुवा येथे ही घटना मार्च ते जून २०१५ मध्ये घडली होती.
अरविंद धन्या पाडवी, रा.भोरकुंड, ता.अक्कलकुवा असे आरोपीचे नाव आहे. या खटल्याची संक्षिप्त हकीकत अशी, भोरकुंड येथील युवती ही आईवडिल व भावंडांसह राहत होती. युवतीचे आई-वडिल शेतात कामासाठी गेले असता गावातीलच अरविंद धन्या तडवी याने लग्न करावयाचे सांगून जबरीने तिच्यावर अत्याचार केले. कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे युवती गप्प राहिली. त्याचा फायदा घेत अरविंद तडवी याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. युवतीच्या पोटात दुखत असल्याने तिला २६ जून २०१५ रोजी नंदुरबारातील खाजगी दवाखान्यात आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून ती तीन महिने गर्भवती असल्याचे निदान केले. युवतीच्या पालकांनी आणि पोलिसांनी विचारणा केली असता तीने नवसारी येथे कामास गेली असता एकाने जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले.
पोलिसांनी तपास केला असता ती घटना खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर युवतीने कबलून अरविंद तडवी याने अत्याचार केल्याची खरी माहिती दिली. त्यानंतर युवतीच्या फिर्यादीवरून अरविंद तडवी याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ पालवे व उपनिरिक्षक जीवन परदेशी यांनी शहादा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. व्ही.एम.पठाडे यांच्यापुढे हा खटला चालला.
न्यायालयाने साक्षीपुरावे लक्षात घेता अरविंद तडवी यास दोषी ठरवत त्यास सात वर्ष सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.यशवंतराव मोरे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी रवींद्र पवार व नासीरखान पठाण यांनी काम पाहिले.

Web Title: Sentenced to rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.