ब्राrाणपुरीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:28 IST2019-09-09T12:28:51+5:302019-09-09T12:28:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणा:या एका दोन वर्षीय बालिकेला डेंग्यू आजाराची ...

Sensation of Dengue-like Disease in Breast Implants | ब्राrाणपुरीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ

ब्राrाणपुरीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणा:या एका दोन वर्षीय बालिकेला डेंग्यू आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गावात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एक, तीन व चारच्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू  असल्याने गटारी तुंबल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे डास-मच्छराचा मोठय़ा प्रमाणावर  प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून बालके हिवताप, सर्दी, खोकला, पांढ:या पेशी, तांबडय़ा पेशी कमी होत होणे आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. गावातील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणारी उर्वशी गोविंदा राजपूत (2 वर्षे) या बालिकेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता हिला डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या बालिकेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने व  दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रोगराई पसरून बालकांसह आबालवृद्धांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.
धूळ फवारणीची मागणी
ब्राrाणपुरी येथे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव झाल्याने डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गावात फोगिंग मशीन आणून धूळ फवारणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अंगणवाडी एकजवळील उघडी विहीर धोकेदायक
अंगणवाडी क्रमांक एकजवळील उघडय़ा विहिरीमुळे डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने  या विहिरीमधेच डेंग्यूचे डास निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जवळच अंगणवाडी असल्याने पालक आपल्या मुलाना अंगणवाडीत पाठवायला तयार होत नाहीत. संबंधितांनी या विहिरीजवळ त्वरित साफसफाई करून उघडय़ा विहिरीला झाकण बसवण्यची मागणी होत आहे.
आरोग्य विभागाकडून पाहणी 
गावात ज्या भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले त्याठिकाणी तसेच ज्या भागात अस्वच्छता आहे त्या परिसरात स्वच्छतेसाठी आरोग्य विभागामार्फत गृहभेटी देऊन रुग्ण तपासणी केली जात आहे.

Web Title: Sensation of Dengue-like Disease in Breast Implants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.