सारंगखेडा हद्दीतील ऊसाच्या शेतात मृतदेहाचा सांगाडा आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:17 IST2019-02-26T12:17:00+5:302019-02-26T12:17:05+5:30
सारंगखेडा : सारंगखेडा हद्दीतील ऊसाच्या शेतात मृतदेहाचा सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद ...

सारंगखेडा हद्दीतील ऊसाच्या शेतात मृतदेहाचा सांगाडा आढळल्याने खळबळ
सारंगखेडा : सारंगखेडा हद्दीतील ऊसाच्या शेतात मृतदेहाचा सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
शहादा-सारंगखेडा रस्त्यावर सारंगखेडा गावाच्या हद्दीतील रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात हा सांगाडा आढळून आला. अंदाजे 55 ते 60 वर्ष वयाचा पुरूष जातीचा हा सांगाडा आहे. त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू त्या ठिकाणी आढळून आलेली नाही. अंदाजे दोन ते तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालावा असा अंदाज आहे. याबाबत सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार पाटील करीत आहे.
दरम्यान, खून की अकस्मात मृत्यू याचा तपासाचेही आव्हान पोलिसांपुढे राहणार आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात काय निष्पन्न होते याकडेही लक्ष लागून असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास राहणार आहे.