कोरोना महामारी व उच्च शिक्षणावरील परिणाम विषयावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:55+5:302021-02-05T08:09:55+5:30
डॉ. चाकणे यांनी कोविड-१९ मुळे एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले अमूलाग्र बदल अधोरेखित करत या महामारीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजना ...

कोरोना महामारी व उच्च शिक्षणावरील परिणाम विषयावर चर्चासत्र
डॉ. चाकणे यांनी कोविड-१९ मुळे एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले अमूलाग्र बदल अधोरेखित करत या महामारीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवकांनी जे भरीव कार्य केले त्याचे कौतुक करत येथून पुढील काळातही एक आशावादी दृष्टिकोन कायम ठेवत राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवक व शिक्षकांनी आपली भूमिका बदलून काम करण्याचे आवाहन केेले. डॉ चाकणे यांनी यापुढेही शिक्षकांसाठी निर्माण होणाऱ्या संधींचे सोने करावे असे म्हटले.
डॉ साळुंके यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे योगदान अधोरेखित करत स्वयंसेवकांनी जी समाजसेवा केली ती कौतुकास्पद असून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःला तसेच समाजाला आकार देण्याची संधी मिळत असते असे नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभागीय संचालक डी कार्तिकेयन, राज्याचे संपर्क अधिकारी डॉ प्रभाकर देसाई, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रासेयो व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ पंकजकुमार नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी, उपप्राचार्य डॉ आर आर कासार, उपप्राचार्य डॉ एम जे रघुवंशी, रासेयोचे नंदुरबार जिल्ह्याचे समन्वयक डॉ माधव कदम उपस्थित होते. या राष्ट्रीय चर्चासत्राकरिता एकूणच संपूर्ण देशातून ४०० पेक्षा जास्त प्राध्यापकांनी व स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला. राष्ट्रीय चर्चासत्राच्या विषयाला अनुसरून ४० प्राध्यापकांनी आपले संशोधन पेपर सादर केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल भुयार यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ दिनेश देवरे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता पिंपरे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. उपेंद्र धगधगे यांनी मानले. आयोजनासाठी डॉ विजय चौधरी, डॉ सुलतान पवार, प्रा निलेश चव्हाण, डॉ तारक दास, प्रा केशव परदेशी, प्रा जितेंद्र पाटील, डॉ स्वप्निल मिश्रा, प्रा अमोल पाठक, प्रा अश्विन पटेल यांनी परिश्रम घेतले.