शहादा विज्ञान महाविद्यालयातर्फे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:13+5:302021-06-11T04:21:13+5:30

अध्यक्षस्थानी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे प्रभारी कुलगुरू डॉ.बी.व्ही. पवार होते. चर्चासत्राचे उद्घाटन पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी गांधीनगर ...

Seminar on behalf of Shahada Science College | शहादा विज्ञान महाविद्यालयातर्फे चर्चासत्र

शहादा विज्ञान महाविद्यालयातर्फे चर्चासत्र

अध्यक्षस्थानी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे प्रभारी कुलगुरू डॉ.बी.व्ही. पवार होते. चर्चासत्राचे उद्घाटन पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी गांधीनगर (गुजरात) येथील डायरेक्ट जनरल डॉ.एस. सुंदर मनोहरन यांच्या हस्ते करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून संगमनेर महाविद्यालयाचे प्रा.श्रीहरी पिंगळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शांताराम बडगुजर यांनी वेबिनार घेण्यामागची भूमिका मांडली. डॉ.एस. सुंदर मनोहरन यांनी ‘आउटकम बेस्ड शिक्षण प्रणाली’ या संकल्पनेची माहिती देऊन आधुनिक काळातील शिक्षणाच्या पद्धती मांडल्या. प्रा.श्रीहरी पिंगळे यांनी महाविद्यालयाचे व्हीजन, मिशन व प्रोग्राम आऊटकम, प्रोग्राम स्पेसीफीक आऊटकम आणि कोर्स आऊटकम यांच्यातील परस्पर सहसंबंध स्पष्ट करून त्याद्वारे विद्यार्थांची प्रगती वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने अभ्यासता व मोजता येईल यासंदर्भात विश्लेषण केले. प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी वॉशिंग्टन अकॉर्डनुसार नॅक मूल्यांकनातील विद्यार्थ्यांच्या सर्व स्तरावरील मूल्यामापनाचे महत्व अधोरेखित केले.

मान्यवरांचा परिचय वेबिनारचे संयोजक प्रा.डॉ.उल्हास सोनवणे, आय.एम.आर.डी.चे प्रभारी संचालक प्रा.अनिल पाटील व प्रा. योगेश पाटील यांनी केला. आभार प्रा.सोनाली पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा.इरफान पठाण यांनी सांभाळली. या वेबिनारमध्ये भारतातील २७ राज्यातून ४०० हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. वेबिनारसाठी प्रा.डॉ.कैलास चव्हाण, प्रा.संतोष तमखाने, प्रा.डॉ.जयेश गाळणकर व दोन्ही वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Seminar on behalf of Shahada Science College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.